शेकाप युवानेते प्रमोद म्हात्रे यांचे निधन

। पेण । वर्ताहर ।
पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे युवानेते प्रमोद दत्तात्रेय म्हात्रे यांच हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 51 वर्ष होते.

खारेपाटातील सरेबाग सारख्या दुर्गम भागात त्यांचा जन्म झाला. आई-वडिल दोघे ही शिक्षक असल्याने महाविदयालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमोद म्हात्रे हे राज्यमंत्री स्व. मोहन भाई पाटील यांच्या विचाराने प्रेरित होउन शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवाहात आले आणि राजकीय प्रवासाला सुरूवात केली. शेतकरी कामगार पक्षाचा खारेपाटाचा लढवय्या युवा नेता म्हणून अल्पावधीत त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांनी शिर्की ग्रामपंचायतीच सरपंच तसेच उपसरपंच पद भुषवीले. सेझ विरूध्दचा लढा, अर्बन बॅक लढा, पाण्यासाठी मुंबई पद यात्रा अशा एक ना अनेक लढ्यात माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या सोबत त्यांनी हिरहिरीने भाग घेतला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे शेतकरी कामगार पक्षाची कळत न कळत हानी झाली आहे.

पेण येथील विश्‍वेश्‍वर स्मशानभूमीत प्रमोद म्हात्रे यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांन समवेत माजी आ. धैर्यशिल पाटील, जि.प. सदस्य हरि ओम, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, शेकाप तालुका चिटणीस संजय डंगर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती परशुराम पाटील, उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, सदस्य संदेश ठाकूर, नगरसेवक शोमेर पेणर, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे आदीसह मोठया प्रमाणात मित्र परिवार उपस्थित होता.

Exit mobile version