मूकबधिर विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण

सीईओ पाटील यांचे प्रतिपादन
श्रवणयंत्रांचे वाटप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेईल,असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यातील शासकीय मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता.3) श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी मूकबधिर विद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी डॉ. किरण पाटील यांनी विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यासोबत संवाद साधत जिल्हा परिषद प्रशासनाकडून विद्यालयाला आधुनिक साहित्य पूर्विण्यासोबत विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यालयालख संगणक भेट देण्यात येतील अशी ग्वाही दिली.

सोमवारी सकाळी डॉ. किरण पाटील यांनी शासकीय मूकबधिर विद्यालय येथे भेट दिली. यावेळी सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्याना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शिक्षणकांसोबत संवाद साधत विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आणखी काय प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून समोर आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना केले व विद्यार्थ्याना श्रवणयंत्रांचे वाटप केले. यांनतर त्यांनी विद्यालयातील वर्गखोल्या, निवासव्यवस्था, स्वयंपाकघर यांची पाहणी केली. यावेळी मूकबधिर विद्यालयाचे प्रभारी अधीक्षक किशोर वेखंडे, विशेष शिक्षक सतीश शिंदे, विशेष शिक्षक आनंद बोरकर, काळजीवाहक भीमा हिंदोळा, पहारेकरी वालकु पारधी उपस्थित होते.

Exit mobile version