गतिमान स्पर्धेसाठी गुणवत्ता अनिवार्य : प्रा. कुलकर्णी

। श्रीवर्धन । वार्ताहर।
रिव्हाईज्ड फ्रेमवर्क ऑफ नॅक या विषयावर नॅक मूल्यांकन समिती सदस्या व बोर्डीच्या एन.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ.अंजली कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. 20 रोजी श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. कॉलेजच्या नॅक मूल्यांकनाची तयारी प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी व नॅक समन्वयक प्रा.वाल्मिक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाने सर्व प्राध्यापक जोमाने करीत आहेत. आतापर्यंत महाविद्यालयाने अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.व सर्वार्थाने दर्जा उंचावण्याचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशी भावना प्राचार्या डॉ. अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

या कॉलेजच्या नॅकच्या कामाला गति आली असून लवकरच स्वयंमूल्यांकन अहवाल पाठविण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी भावना प्रा.वाल्मिक जोंधळे यांनी व्यक्त केली. डॉ.अंजली कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी डॉ.कल्याणी नाझरे यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य नंदा जोशी यांनी प्राचार्या डॉ.अंजली कुलकर्णी यांच्या उत्तुंग शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला.महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री.नितीन सुर्वे यांनी डॉ.कुलकर्णी यांच्याबद्दलच्या आपल्या विनम्र व कृतज्ञता भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version