| पनवेल | प्रतिनिधी |
कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्चार्यांचे प्रश्न मार्गी लागले असून, त्यांना भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएस पावत्या मिळण्यास सुरूवात झाली आहे.
कोकण शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएस बाबत येथील अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह, ठाणे यांच्या कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालघर, ठाणे वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक कांबळे यांच्या सहकार्याने पालघर, ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी स्लिप वाटप करण्यात आली. भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएची प्रकरणे तात्काळ मार्गी लागावे, याकरिता आ. पाटील यांच्या निधीमधून डीसीपीएस पावत्या वितरित करण्याबाबत संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना राज्याध्यक्ष भानुदास तुरूकमाने, सहायक लेखाधिकारी जोशी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.