रब्बी हंगामातील पिक धोक्यात

कालव्याची कामे अर्धवट
15 दिवस उशिरा सोडले कालव्याला पाणी
। माणगाव । प्रतिनिधी ।
काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी 15 डिसेंबरला सोडण्यात येते; या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने उशिरा हाती घेतली होती. त्यातच अपुरी मशिनरी आल्याने कालव्याची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ व पुरेसी साधनसामुग्री मिळाली नसल्याने कालव्याची कामे अर्धवट करून कसेबसे तब्बल 15 दिवसांनी कालव्याला उशिरा पाणी सोडल्याने ऐन रब्बी हंगामात दुष्काळात तेरावा महिना निघाला असल्याची चर्चा शेतकर्‍यातून उमटू लागली आहे. 15 दिवस उशिरा पाणी आल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
यापूर्वी या कालव्याची दुरुस्तीची कामे शासन ठेकेदारामार्फत करीत होते. गेल्या 8 ते 10 वर्षापासून ही कामे पाटबंधारे विभागाकडून मशिनरी द्वारे केली जातात. त्यामुळे ती अर्धवट व थातूरमातूर करून शेकर्‍यांच्या तोंडला पाने पुसली जातात. याकडे शासनाचे पूर्णता दुर्लक्ष असून यंदाचे वर्षी 15 दिवस भात कापणी उशिरा होणार असून पाऊस वेळेत सुरु झाल्यास खरीप हंगामातील मशागतीची कामे करण्यास शेतकर्‍याना पुरेसा वेळ मिळणार नाही. तर रब्बी हंगामातील पिक व भाताचा पेंढा भिजण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामावर प्रश्‍नचिन्ह उभारले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात या कालव्याला मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ साठला होता. त्याच बरोबर शेवाळ व झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. या कालव्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाला दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही नुकतीच हाती घेतली असून या कामाची गाडी धीम्याच गतीने सुरु होती. सध्या हि कामे सुरु झाल्याने रब्बी हंगामातील शेतीला कालव्याचे पाणी मिळणार असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. रब्बी हंगामातील भात पिक घेण्यासाठी शेतकरी अतुरला असून शेतकरी चांगलाच रब्बी हंगामाच्या कामाला लागला होता. रब्बी हंगामातील पिक घेण्यासाठी आपल्या शेताची मशागतीची कामे पूर्ण करून कालव्याच्या पाण्याची वाट पाहत होता. अखेर पंधरा दिवस उशिरा पाणी आल्यामुळे यंदा रब्बी हंगामाचे पिक धोक्यात येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

यंदाच्या वर्षी शासनाकडून कालवा दुरुस्ती व सफाई करण्यासाठी अल्प प्रमाणात मशिनरी आली होती. आपण तीन महिन्यापासून मशिनरी मागविलेली होती. ती उशिरा मिळाली त्यामुळे कामाला उशीर झाला. शेतकर्‍यांचीही पाण्याची मागणी उशिरा आली. तसेच मध्यंतरी झालेल्या पावसामुळे सफाईच्या कामास अडथळा निर्माण झाला.
श्री. लोहकर, पाटबंधारे उपअभियंता.

Exit mobile version