राधाबाई पाटील यांचे निधन

| नागोठणे | वार्ताहर |

रिटघर येथील रहिवासी व गावतील वारकरी सांप्रदाय तसेच महिला मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ ह.भ.प. राधाबाई कृष्णा पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रिटघर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंकस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रतील मान्यवर, त्यांचे नातेवाईक, विभागातील नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत राधाबाई पाटील यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगे प्रकाश, कृष्णा एक विवाहित मुलगी सुगंधा भगत, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य विधी शनिवार दि. 17 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी होणार असून, यानिमित्त सकाळी 10 ते 12 दरम्यान ह.भ.प. सुरेश महाराज यांचे कीर्तन होणार असल्याचे पाटील कुटुंबियंकडून सांगण्यात आले.

Exit mobile version