अनिल गायकवाड यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवण्यात आले आहे. याआधी सात वेळा त्यांना मुदत वाढवून मिळाली होती. त्यांच्या जागी आता अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आधी राधेश्याम मोपालवार यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्या काळातही त्यांना स्थान मिळाले होते. तसेच तब्बल सात वेळा त्यांना मुदत वाढवून मिळाल्याने ते चर्चेचा विषय ठरले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील महत्वांकाशी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामातही मोपालवार यांनी काम पाहिले आहे.