| महाड | प्रतिनिधी |
महाडच्या ऐतिहासिक न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी (दि.26) आयोजित कार्यक्रमात राही साळवीने केलेल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले. या न्यायालयाचे विशेष ऐतिहासिक महत्त्व म्हणजे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानतेची ज्योत प्रज्वलित केली. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथेच सत्याग्रहाद्वारे सर्वांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला होता. त्याच ठिकाणी आज एका आठ वर्षाच्या लहानग्या चिमुकलीने राहीने देशाच्या ऐक्य, विकास आणि संविधान मूल्यांची भक्कम बाजू मांडली. याप्रसंगी ॲड. गणेशजी कारंजकर आणि ॲड. संदीप सर्कले या दोघांनी राहीला व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळण्यासाठी विशेष मेहनत घेतली आणि तिचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळेच राहीला या ऐतिहासिक न्यायालयातील कार्यक्रमात भाषण करण्याची संधी प्राप्त झाली. या मोलाच्या योगदानाबद्दल राहीच्या कुटुंबियांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.







