राहुल द्रविडचा पत्ता कट?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी बीसीसीआय लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. त्यानंतर राहुल द्रविडच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल. याचदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे वक्तव्य समोर आले आहे. जय शहा म्हणाले की, भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षकपदावर राहायचे असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. वास्तविक, राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर बीसीसीआय सचिव म्हणाले की, राहुल द्रविडचा कार्यकाळ फक्त टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे. राहुल द्रविड पुन्हा अर्ज करून प्रशिक्षक होऊ शकतो, हे त्याने काही हावभावांमध्ये स्पष्ट केले, पण त्याचवेळी परदेशी प्रशिक्षकाबाबतच्या अटकळांनाही त्यांनी नकार दिला नाही.

Exit mobile version