राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल

136 दिवसांनंतर केलं कमबॅक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली. राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यामुळे राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.



राहुल गांधी तब्बल 136 दिवसांनंतर आज संसदेत आले आहेत. मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांच्या शिक्षेनंतर 24 मार्च रोजी खासदारपद गेले होते. 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. तीन दिवसांनंतर त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. राहुल गांधींची लोकसभेत ग्रँड एंट्री झाली आहे. काँग्रेस नेत्यांसह इंडिया नेत्यांच्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

Exit mobile version