| कर्नाटक । वृत्तसंस्था ।
प्रज्ज्वल रेवण्णा मास रेपिस्ट अर्थात सामूहिक बलात्कारी आहे. कारण त्याने शेकडो महिलांचं शोषण केलं आहे. महिलांचं शोषण करणार्या प्रज्ज्वल रेवण्णासारख्या माणसाला मोदी पाठिंबा देत आहेत, निवडून द्या म्हणत आहेत. त्यांनी याप्रकरणी उत्तर दिलं पाहिजे तसंच देशातल्या तमाम महिलांची माफी मागितली पाहिजे. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
कर्नाटकमध्ये जेडीएसचे उमेदवार प्रज्ज्वलल रेवण्णाच्या कथित सेक्स टेप प्रकरणावरुन आणि पेन ड्राईव्ह प्रकरणावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी कर्नाटकच्या शिवमोगामध्ये पत्रकारांशी बोलत होते. प्रज्ज्वल रेवण्णाने 400 महिलांवर सामूहिक बलात्कार केला आहे. अशा माणसाला निवडून द्या असं मोदी सांगत आहेत. या प्रकरणी मोदींनी देशातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रज्ज्वल रेवण्णा कथित सेक्स स्कँडल आणि 2972 क्लिप असलेल्या पेन ड्राईव्हमुळे अडचणींत आले आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच त्याविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.