राहुल गांधींची याचिका फेटाळली

। सुरत । वृत्तसंस्था ।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मानहानी संदर्भातील याचिका सुरत सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींना तुर्तास खासदारकी मिळणार नाही. कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते.

भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी 2019 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात या संदर्भात अपिल केलं होतं. न्यायालयात केलेल्या अपिलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.

Exit mobile version