राहूल मुख्य प्रशिक्षकाच्या रिंगणात

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली. दरम्यान, बीसीसीआयने कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले होते. हे वृत येईपर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाची चर्चा अजूनही थांबलेली नव्हती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले होते. द्रविडने वेळ मागितला आहे, जेणेकरून तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू इच्छितो की नाही याचा विचार करू शकेल. राहुलने अद्याप या प्रकरणावर स्पष्ट मत दिलेले नाही, असे गांगुलीने यापूर्वी सांगितले होते. द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. व्ही.व्ही. एस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) द्रविडची जागा घेऊ शकतो. सध्या द्रविड एनसीएचा प्रमुख आहे. काही दिवसांपूर्वी द्रविडचे सहकारी पारस म्हाम्ब्रे यांनी भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. टी-20 विश्‍वचषकानंतर रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार आहेत. त्यानंतर बीसीसीआयसाठी द्रविड हा आवडता पर्याय होता. दुबईत सपन्न झालेल्या आयपीएलदरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह आणि गांगुली यांनी द्रविडसोबत चर्चा केली होती.

Exit mobile version