| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीमध्ये सुधागड तालुक्यातील राहुल सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे. या नव्याने गठीत करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर सुरेश खुटवड असून, सदस्य म्हणून पोलीस उपअधीक्षक रवींद्र दौडकर, तहसीलदार किशोर देशमुख, राहुल सावंत, केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेले वैभव गिते, संजय सोनवणे, सुभाष गायकवाड, तसेच पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.







