| राजकोट |
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला मैदानात उतरण्यापूर्वीच धक्के बसत आहेत. विराट कोहलीची अनुपलब्धता, त्यातच श्रेयस अय्यरला दिलेला डच्चू, त्यामुळे के. एल. राहुलवर मधल्या फळीची जबाबदारी येणार होती; परंतु तोही तिसर्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे. मांडीच्या दुखापतीमुळे राहुल दुसर्या कसोटीत खेळला नव्हता. पहिल्या कसोटीत त्याला ही दुखापत झाली होती. राहुलने फलंदाजीचा हलका सराव सुरू केल्याचे सांगितले जात होते. आता तिसरा कसोटी सामना तीन दिवसांवर आलेला असताना राहुल तंदुरुस्त नसल्याचे सांगण्यात आले.
राहुल कसोटीसाठी अनुपलब्ध
