। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदी किनारी पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून सुमारे लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.18) रात्री करण्यात आली होती. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात एकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने चिपळूणमध्ये गावठी हातभट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी झाडी झुडपामध्ये छापा टाकला असता या ठिकाणी एकजण गावठी दारू गाळत असताना आढळून आला. तसेच, यावेळी दारू उपयोगी साहित्य गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन मिळून आले. सुमारे 1 लाख 9 हजार 900 रुपयांचा हा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पेढे-परशुराम येथील मंगेश मधुकर दिवेकर (27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.