कर्जत येथे जुगार अड्ड्यावर धाड; कामगारांवर गुन्हा दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सांगवी येथील एका फार्महाऊस वर सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धड टाकून जुगार खेळणार्यावर कारवाई केली. मात्र त्या घराच्या मालकावर आणि अन्य महत्वाच्या लोकनावर पोलिसांनी कारवाई केली नाही अशी चर्चा असून केवळ कामगारांवर कारवाई केली अशी माहिती समोर येत आहे.

सांगवी येथील सनझारा या फार्महाऊसवर रायगड पोलिसांनी धाड टाकून येथे चालणारा बेकायदेशीर जुगार आणि मटका पोलिसांनी उध्दवस्त केला. खरा मात्र ज्या जागेत हा कल्याण जुगार मटका चालत होता त्या फार्म हाऊस मालकावर कोणती करावी केली याबाबत गुप्तांच्या पाळली जात आहे.पोलिसांनी ज्या नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ते त्याच फार्म हाऊसवर गार्डन मध्ये काम करणारे मजूर आहेत.ज्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्या एकच रंगाच्या पेहरावावरून हे या फार्म वर काम करणारे मजूर असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट होत आहे.

कर्जत पोलिस आणि दादर सागरी पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.दरम्यान या गुन्ह्याचे तपास अधिकारी गोविंद पाटील त्यांनी याबाबत प्रस्तुत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले उत्तर देणे बंधनकारक नसून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो असे आमच्याशी बोलले त्यामुळेच मात्र फार्म हाऊस मालक अब्बास शेख त्यांच्यावर पोलिस मेहरबान का झाले अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Exit mobile version