। चिपळूण । प्रतिनिधी ।
वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एक जण दारु गाळत असताना पोलिसांना सापडला. या कारवाईत 99,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मंगेश मधुकर दिवेकर (वय 28, रा. पेढे, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.







