आसूडगावातील इंटरनेट बारवर छापा

12 जणांविरोधात गुन्हा दाखल

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील आसूडगाव, सेक्टर 4 परिसरातील एका इंटरनेट बारवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत बारमधील अश्लील प्रकार उघडकीस आला असून, एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.15) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास संबंधित बारमध्ये काही महिला अंगप्रदर्शन करून अश्लील हावभाव करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर पथकाने तत्काळ संबंधित बारवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान चार महिला अश्लील हावभाव करताना आढळून आल्या. तसेच, बारमधील मॅनेजर आणि काही कर्मचारी या प्रकारास प्रोत्साहन देत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच बारमध्ये उपस्थित काही ग्राहकांनी घाईघाईने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत पुढील कारवाई केली. या प्रकरणी नऊ महिला गायक, बार मॅनेजर सुरेश वासू शेट्टी, तसेच वेटर अरुण विनोद पासवान आणि मुन्ना चौधरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version