| पनवेल | वार्ताहर |
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा नावडा फाटा येथील कलम पंजाब या लेडीज बारवर छापा मारून 15 महिला वेटरसह बारमधील मॅनेजर, वेटर अशा एकूण 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा बार ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिकवेळ सुरू असल्याचे तसेच बारमधील महिला वेटर या अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करताना आढळून आल्याने या बारवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या बार संदर्भातील माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंक कक्षाने नावडे फाटा येथील कलम पंजाब या लेडीज बारवर छापा मारला.
लेडीज बारवर छापा; 21 जण ताब्यात
