। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा येथे पारनाका नजीक जनसेवा डेअरीच्या बाजुला लोकांकडून पैसे स्विकारून चिठ्ठयावर आकडेमोड लिहून कल्याण-मेन नावाचा जुगाराचा मटका बेकायदेशीरपणे चालवित असलेल्या दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखा अलिबाग यांनी कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेवदंडा येथे पारनाका नजीक जनसेवा डेअरीच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी (दि. 12) सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेने धाड टाकून लोकांकडून पैसे स्विकारून चिठ्ठ्यांवर आकडेमोड लिहून कल्याण-मेन नावाचा जुगाराचा मटका बेकायदेशीरपणे चालवित असलेल्या 54 वर्षीय ताजपुर येथील रहिवाशी अनंत शंकर पाटील यांस रंगेहाथ पकडले. या कल्याण-मेन मटक्याची रक्कम आशिष गोंधळी यांचेकडे जमा करत असे, अलिबाग गुन्हे अन्वेषक यांनी या दोघांवर कारवाई करून यामध्ये एकूण 3835 रूपये रक्कम जप्त करून ताब्यात घेतली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस.ए.गव्हाणे हे पोलीस ठाणे इन्चार्ज सहा. पोलीस निरिक्षक श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.






