| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काही ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईवेळी बेंगळुरू येथून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. तसेच एनआयने मुंबई येथून एकाला ताब्यात घेतले आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मोहम्मद आरिफ असे त्याचे नाव आहे. आरिफ गेल्या दोन वर्षांपासून अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, असा दावा एनआयएने केला आहे. एवढेच नाही तर तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तानला जाण्याच्या तयारीत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरिफ अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी संघटनेत सामील होण्याच्या तयारीत होता, एनआयएने त्याला आधीच बेंगळुरू येथून अटक केली आहे. आरिफ बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याने इंटरनेटच्या माध्यमातून अल कायदाच्या संबधितांशी संपर्क केला होता. जेव्हा जेव्हा आरिफला अल कायदाच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधायचा होता तेव्हा तो इंटरनेटच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधायचा. परंतु तो अजूनपर्यंत कोणत्याही कारवाईमध्ये सहभागी झालेला नव्हता.