रायगड बाजार झाले स्मार्ट

नव्या रुपाचा नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड बाजार मध्ये नव्याने सुधारणा करून रायगड बाजार स्मार्ट करण्यात आले त्याचा आज रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी, शेकाप महिला आघाडीप्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील, अ‍ॅड निता पाटील, नगरसेवक प्रदीप नाईक, प्रमोद घासे, अ‍ॅड. सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कोकणातील पहिले डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून सुप्रसिद्ध असणार्‍या रायगड बाजारमध्ये नव्याने सुधारणा करीत आज त्याचे रायगड बाजार स्मार्ट डिजीटलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या प्रतिची सेवा देण्यात येणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक वस्तूवर किमान 7 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1 हजार 499 रुपयांची खरेदी करणार्‍या ग्राहकाला साखर 9 रुपये किलोने उपलब्ध होणार आहे. सहकार भांडार या मुंबईतील 50 वर्षे जुन्या संस्थेच्या सहकार्याने रायगड बाजारने हे पाऊल टाकले आहे.
रायगड बाजारात सर्वच प्रकारचे कडधान्य, डाळी, तेल अशा सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेतच. त्याबरोबर इतर विविध खाद्यपदार्थ, शितपेयं, भांडी, दुग्धजन्य पदार्थ देखील उपलब्ध करण्यात आले असून लवकरच कापड, भाजी, फळ आदी विभागदेखील नव्याने सुरु करण्यात येणार असल्याचे रायगड बाजारच्या व्यवस्थापनाने सांगितले.

Exit mobile version