| पनवेल | वार्ताहर |
बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड यांच्या वतीने 18 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन रविवारी (दि.27) महात्मा स्कूल मैदान, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे करण्यात येत आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान बालेवाडी, पुणे येथे आयोजित होणाऱ्या 18 वर्षाखालील बास्केटबॉल स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. सर्व बास्केटबॉल खेळाडूंना या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी नईम चिकटे 9773913434, विवेक गोरे 8169657919 व आकाश चाकणे 9029596949 यांच्याशी संपर्क साधावा.







