रायगड जिल्हा बुद्धिबळ संघ निवड स्पर्धा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित केलेल्या 09, 17 आणि 13 वर्षाखालील वयोगट रायगड जिल्हा संघ निवड स्पर्धा रविवारी (दि.9) भाग्यलक्ष्मी हॉल, अलिबाग येथे रॅपिड पद्धतीने घेण्यात आली होती.

9 वर्षाखालील गटात अनुक्रमे आयान मोडक- पेण, आयुष खाडे- पेण, तर मुलींच्या गटात आरोही पाटील- उरण, ओजस्वी थळे- अलिबाग यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. आरोही गणेश गवळी- अलिबाग हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. 9 वर्षाखालील हा संघ गट 5 ते 7 मे रोजी नागपूर येथे होणार्‍या राज्य स्पर्धेसाठी रवाना होईल.

17 वर्षाखालील गटात अनुक्रमे सर्वेश करडे, अथर्व वाघ- अलिबाग, अमेय मंगेश घरत- अलिबाग, मुलींच्या गटात पल्लवी पाटील, कर्जत येथील ज्ञानदा गुजराथी यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक मिळविला.

13 वर्षाखालील गटात श्राव्य अनिल गावंड- पनवेल, अविनाश चिंचोलकर- पनवेल, तर मुलींच्या गटात अपेक्षा मारभल- अलिबाग, शर्वरी पाटील, आर्या मयूर पानसरे- महाड  यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.                                                                                        
यावेळी विलास म्हात्रे, राजेश्री घरत रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना पदाधिकारी तसेच चंद्रशेखर पाटील (सिनियर नॅशनल पंच पनवेल), बुद्धिबळ प्रशिक्षक समीर परांजपे उरण, किशोर देशपांडे-गोरेगाव, मिलिंद बोधनकर-खोपोली, राहुल रहाळकर, मयूर पानसरे-महाड, मिसेस तरनुंम मोडक पेण हे उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख पंच म्हणून सुशील गुरव यांनी काम पाहिले, तर संमिल गुरव, आविष्कार मारभल, अथर्व  दातार यांनी पंच म्हणून काल पाहिले.

Exit mobile version