| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर वरिष्ठ गटाच्या दोन दिवसीय कसोटी फॉरमॅट नुसार घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतील 15 सामन्यांचे आयोजन आरडीसीए पुढाकारांने करण्यात येते आहे. पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील रायगड विरुद्ध सेंट्रल डिफेन्स अकॅडमी संघांमधील सामन्यासाठी पंच म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पहिले युवा आंतरराष्ट्रीय (आयसीसी व बीसीसीआयचे) पंच विनीत कुलकर्णी व महाराष्ट्र क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष अजय देशपांडे यांची नियुक्ती एमसीएतर्फे करण्यात आली होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष अजय देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, जिल्ह्यात एमसीएच्या महत्वाच्या मॅचेस सुधा भविष्यात होऊ शकतात त्यासाठी चांगल्या दर्जाचे मैदान व उत्तम खेळपट्टी तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडे स्वतःचे मैदान असावे यासाठी प्रयत्नशील असल्याचा सर्वांना आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराच्या कार्यक्रमासाठी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, राजेश पाटील, प्रशांत ओक, अरुण शिंदे, देवेंद्र पाटील, श्याम पाटील, मुख्या प्रशिक्षक शंकर दळवी रणजीपटू योगेश पवार, दिनेश सावंत, दिलीप लाड, शेखर भगत, सुयोग चौधरी, चंद्रकांत चौधरी, ॲड. पंकज पंडित, रवी सोलंकी, विश्वजित जगदाळे यांच्या सह दोन्ही संघांचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





