रायगड जिल्हा हाऊसफुल्ल

| रायगड | प्रतिनिधी |

नाताळच्या सुट्ट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे स्थिरावली आहेत. त्यामुळे गुरुवार दि.25 डिसेंबर पासुनच रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र व इतर पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालय सहलींचा ओघ वाढत आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. रायगड व कोकणचे मनमोहक सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असून यंदा रायगड जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.


2025च्या शेवटच्या विकेण्डला अलिबाग समुदकिनारी पर्यटकांनी भरपूर गर्दी केली होती. मात्र, आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवासावेळी अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Exit mobile version