रायगड जिल्हास्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा

दिपक राऊल ठरला रायगड श्रीचा मानकरी

| खारेपाट | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील जय हनुमान व्यायाम शाळा बेलपाडा कावाडे आयोजित रायगड जिल्हास्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत दिपक राऊल रायगड श्रीचा मानकरी ठरला तर दिनेश पाटीलने खारेपाट श्रीचा किताब पटकावला. स्पर्धेत बेस्ट पोझर कुनाल कुबल यशस्वी ठरला. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुमोर 40 स्पर्धेक सहभागी झाले होते. यावेळी अनेक खेळ स्पर्धेकांचा मान्यवरांच्या हास्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धा रायगड जिल्हा बॉडी बिल्डींग असोशिएशनच्या मान्यतेने पार पडल्या. स्पर्धेचे शुभारंभ महाराष्ट्र कबड्डी आसोशिएशन पदाधिकारी अ‍ॅड. अस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती अनिल पाटील, शरद पाटील, प्रतिकेश पाटील, गणेश पाटील व खारेपाटातील प्रतिष्ठित मंडळी होती. या भव्य बॉडी बिल्डींगच्यास्पर्धा गेली 14 वर्षे सातत्याने भरविण्याचे आयोजन शरद पाटील व त्यांच्या सहकारी करीत आहे. यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

स्पर्धेला दशरथ पाटील, माजी उपसभापती प्रकाश पाटील, संजय पाटील, विशाल जुयकर आदींनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अनिल पाटील, शरद पाटील अन्य मंडळाच्या वतीने देण्यात आले.

Exit mobile version