रायगड जिल्हा अतिरेक्यांच्या टार्गेटवर?… बोटीत सापडल्या संशयित वस्तू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टिने संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीसही सतर्क झाले आहेत. याच पार्श्‍वभुमीवर श्रीवर्धन पोलिसांना हरिहरेश्‍वर येथील समुद्रकिनारी बोट सापडली असून त्यात संशयित वस्तू आढळल्या असल्याची चर्चा स्थानिकांनी दिली.

त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांमध्ये अतिरेक्याची दहशत पसरली असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता अधिकृत माहिती दुपारनंतर देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Exit mobile version