रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसाधारण सभा

सभासदांना 12.50 टक्के लाभांश जाहीर ; पाच हजार कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करणार, चेअरमन आमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन


| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबाग येथील केंद्र कार्यालयात रविवारी पार पडली. या सभेमध्ये सभासदांना सलग तिसऱ्या वर्षी 12.50 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेने सन 2022-23 या वर्षामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करीत रु.51.00 कोटी इतका ढोबळ नफा व रु.25.84 कोटी इतका निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. यामुळे सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी केले. पोलिसांची मुले शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाणे सुद्धा अधिक महत्वाचे असून त्यांच्या पाल्यास शैक्षणिक कर्जामध्ये दोन टक्के सवलत देण्यात येईल असेही आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले.

बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, ज्येष्ठ सभासद शंकरराव म्हात्रे, बँकेचे सर्व विद्यमान संचालक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेतील अधिकारी वर्ग , कर्मचारी वर्ग आणि सभासद, भागधारक यावेळी उपस्थित होते. सभेमध्ये इर्शाळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक, बँकेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा गिदी, बँकेचे कर्मचारी यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन बँकेचे सिनियर मॅनेजर संदीप जगे यांनी केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकने सातत्यपूर्ण कामगिरी करत ऑगस्ट 2023 पर्यंत रु.4924 कोटींचा व्यवसायाचा यशस्वी टप्पा गाठला आहे, या आर्थिक वर्षात हा टप्पा रु.5500 कोटींच्या पुढे असेल तसेच बँकेने रु.584 कोटींचा स्वनिधीचा टप्पा पार केला आहे, बँकेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा टप्पा असून यापुढील काळात हा स्वनिधी 1000 कोटींच्या पुढे असेल असे बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी सभासदांना आश्वासित केले. शिवाय त्यांनी आपल्या मनोगतामध्ये बँकेचे ग्राहक, सभासद, भागधारक यांचे आभार व्यक्त करून कर्मचाऱ्यांनी या आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय 1150 कोटींपेक्षा अधिकने वाढविल्याबद्दल त्यांनादेखील बँकेच्या वतीने 20 टक्के बोनस जाहीर केला.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक बँकेच्या कामगिरीबाबत उपस्थितांना माहिती देताना म्हाणाले की, बँकेने 31 मार्च 2023 अखेर रु4327 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असून रु.2574 कोटींच्या ठेवी रु.1753 कोटींचे कर्जवाटप केले आहे . तसेच आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत वैधानिक लेखापरीक्षणामध्ये अ ऑडीट वर्ग मिळविलेला आहे. बँक सप्टेंबर 2023 अखेर रु.5000 कोटींचा व्यवसाय टप्पा नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वासत्यांनी बोलून दाखवला. शिवाय बँकेच्या वतीने या आर्थिक वर्षात तब्बल 3000 पेक्षा अधिक नव्याने रिटेल कर्जप्रकरणांचे वाटप करून हा व्यवसाय या आर्थिक वर्षात 150 कोटींपेक्षा अधिक वाढविला आहे असेही उपस्थितांना सांगितले, तसेच बँकेने आपल्या नेट एनपीएचे प्रमाण दरवर्षीप्रमाणे शून्य टक्के राखले असून ढोबळ एनपीएचे प्रमाण 1.21 टक्क्यांनी कमी केले आहे असे वर्तक म्हणाले.

1)बँकेचा स्वनिधी 1000 कोटीपर्यंत नेणार.
2) पोलिस पाल्यास शैक्षणिक कर्जामध्ये 2% सवलत
3) संस्था संगणकीकरणाच्या माध्यमातून शेती संस्था अधिक सक्षम करणार
4)विविध कार्यकारी संस्थाच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारणार

Exit mobile version