। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिला खुलागट क्रिकेट निवड चाचणी शनिवारी ( दि. 18 ) घरत क्रिकेट ग्राउंड खारघर स्टेशन समोर, खारघर येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीमधून रायगड जिल्ह्याचा महिला खुलागट क्रिकेट संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रित स्पर्धेत सहभागी होईल.
या निवड चाचणीत फक्त रायगड जिल्ह्यातील महिला खेळाडूनाच प्रवेश दिला जाणार आहे. निवड चाचणीसाठी येणार्या महिला खेळाडूंनी सकाळी 8. 30 वाजत मैदानात उपस्थित राहावे. निवड चाचणीला येताना खेळाडूंनी क्रिकेटचा सफेद गणवेश परिधान करावा. खेळाडूंनी सोबत आधार कार्डची सत्यप्रत आणावी. निवड चाचणीच्या अधिक माहितीसाठी संदीप पाटील 8369789385, प्रीतम कय्या 9322243534 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी केले आहे.