कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा महिला संघ जाहीर

। गडब। वार्ताहर ।

18 ते 20जुलै दरम्यान पुणे बालेवाडी येथे होणार्‍या 71 व्या महाराष्ट्र् राज्य अंजिक्यपद, निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने महिला गटाचा कबड्डी संघ जाहीर केला असुन या संघाचा सराव शिबिर पांडवादेवी येथील जय मंगळ सभागुहात घेण्यात आले या सराव शिबिराचे सांगता समारंभ प्रसंगी आंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख शरद कदम जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य जनार्दन पाटील, राष्ट्रीय राष्ट्रीय खेळांडु ऋणाली मोकल, आदि मान्यवर उपस्थित होते.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा या वर्षाचा महिलांचा संघ चांगला आहे या संघामधे चार राष्ट्रीय खेळांडु आहेत. सर्व खेळांडु चांगले आहेत. समोरचे संघ मातब्वर आसले तरी त्यांच्या विरुध्द चांगळा खेळ करण्याची तयारी केली असुन या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा संघ अंजिक्यपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संघ प्रशिक्षक शरद कदम यांनी सांगितले.

संघ प्रशिक्षक शरद कदम संघ व्यवस्थापिका मोनाली घोंगे यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम सराव केला असुन रायगड जिल्ह्याच्या संघात राष्ट्रीय खेळांडु आहेत. आम्ही सांघिक खेळ करुन रायगड जिल्ह्याला या स्पर्धेत विजेतेपद मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार आसल्याचे कर्णधार सिध्दी नाखवा हिने सांगितले. रायगड जिल्हयाच्या महिला कबड्डी संघात निवड झालेल्या खेळांडुचे रायगड जिल्हा कबडी असोसिएशनच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्हा महिला कबड्डी संघ
सिध्दी नाखवा - कर्णधार, चैताली म्हात्रे - उपकर्णधार, रश्मी पाटील, हर्षदा पाठारे, तेजा सकपाळ, नंदिनी वाघे, रूतुजा पाटील, पल्लवी बागेकर, वैष्णवी पाटील, रचना म्हात्रे, प्रिती पाटील, जानवी पाटील, शरद कदम-संघ प्रशिक्षक, मोनाली घोंगे-संघ व्यवस्थापिका
Exit mobile version