| माणगाव | वार्ताहर |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीनिमित्त छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या रायगड विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मंगळवार दि. 2 जानेवारी रोजी माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. विविधांगी विषयावर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक महादेव जाधव, गड किल्ले अभ्यासक सुखद राणे व रामजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेत इयत्ता आठवीतून प्रथम संस्कृती ऐत, द्वितीय श्रुष्ठी कडू, इयत्ता नववीतून श्रेया मरवडे प्रथम क्रमांक, विधी दाभेकर द्वितीय क्रमांक, इयत्ता दहावीतून कस्तुरी देवकर प्रथम क्रमांक, प्रकाश ढेबे द्वितीय क्रमांक प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण सुखद राणे व रामजी कदम यांनी केले. स्पर्धेचे प्रास्ताविक अजित शेडगे यांनी केले. स्पर्धेसाठी शिक्षक राजन पाटील, दीपक गुजर, दीपक सोनवणे उपस्थित होते.




