महाडची रोशनी पारधी कर्णधार
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. ह्या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणार्या मुलींची निवड महाराष्ट्राच्या संघात होणार आहे. महाडच्या रोशनी पारधी हिच्याकडे रायगडच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे, तर समिधा तांडेल हिला उपकर्णधार करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील मुलींसाठी इनडोअर सराव शिबिराचे आयोजन खारघर येथील इनामपुरीच्या मैदानावर करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी उपस्थित सर्व मुलींना प्रशिक्षक म्हणून नयन कट्टा यांनी मार्गदर्शन केले आहे. संघ निवडकर्ता म्हणून नरेंद्र मयेकर, मितेश ठाकूर व प्रदिप साळवी यांनी योगदान दिले तर प्रमुख निरीक्षक म्हणून देवेंद्र पाटील समन्वयक म्हणून रोहित काळे, प्रशांत माळी, महेंद्र भातिकरे, देवदत्त शास्त्री, प्रितम पाटील यांनी काम पाहिले. तसेच आरडीसीए उपाध्यक्ष राजेश पाटील सहसचिव जयंत नाईक, कौस्तुभ जोशी, शंकर दळवी उपस्थित होते. जिल्हा क्रिकेट असो. अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक सह सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी मुलींच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
रायगड जिल्ह्याचा मुलींचा संघ पुढीप्रमाणे आहे-
रोशनी पारधी कर्णधार, समिधा तांडेल उपकर्णधार, तनिष्का वार्गे, अनिश्का वर्मा, आर्या पाटील, तनश्री सावंत, काजल साळुंके, वेदश्री शेळके (यष्टिरक्षक) मधुरा बाबर (यष्टिरक्षक) अमिषा बामणे, वेदिका तेटगुरे, ईश्वरी खेत्री, वैभवी कुलकर्णी, निशिता विठलानी.
राखीव खेळाडू - स्तुती विठलानी, श्रेया पडळकर, शुभांगिनी दास, स्नेहल पवार, इच्छा यादव, आर्या शेडगे, कनक यादव, श्रीष्टी भोईर, वांशिका मोहिते, भ्रातीती रॉय, गायत्री गोडे, रितिका पाटील, आरुषी जाधव.