पुढचे ४८ तास रायगड धोक्यात; गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गुलाब चक्रीवादळाचे आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसतील. येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार व अतिवृष्टीची पण शक्यता.
मुंबई,ठाणे पण विदर्भात प्रभाव कमी. उद्या उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली असतानाच जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासूनच मुसळधार पर्जन्यवृष्टी ला सुरुवात झाली. मुसळधार अतिवृष्टीमुळे तयार होत आलेल्या भात पिकामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगत काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी. आपला जीव आपल्या मिळकती पेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत तहसील कार्यालयात संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141 228473 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141 222097 या क्रमांक वर संपर्क साधावा.

गुलाब चक्रीवादळाचे आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसतील. येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार व अतिवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण विदर्भात प्रभाव कमी. उद्या उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील.
-IMD

Exit mobile version