रायगड कबड्डीची पंढरी; अनंत गीते यांचे गौरवोद्गार

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
कबड्डी हा तांबड्या मातीतील मर्दानी व रांगडा खेळ असून, सध्या हा खेळ देशविदेशात लोकप्रीय ठरत आहे. या अस्सल मातीतील खेळाला सध्या ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कबड्डी खेळाची पंढरी असून, या मातीतून भविष्यात देशाच्या कबड्डी संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू रायगडच्या मातीतून निर्माण होतील, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते अनंत गीते यांनी यावेळी व्यक्त केला.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व सुधागड तालुका असोसिएशन यांच्या सहकार्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना अनंत गीते यांनी राजकीय भाष्य केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की महाराष्ट्रातील शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे महापुरुषांच्या रक्ताचे व विचारांचे खरे वारसदार, प्रगल्भता असलेले नेते एकत्र आलेले आहेत. ही खूप मोठी ताकत असून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी च्या युतीचा प्रयोग यशस्वी होईल, व ही आघाडी येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देईल असा विश्‍वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्क विष्णु पाटील, यांच्या हस्ते या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 32 संघांचा सहभाग असून, रायगड पालीत कबड्डीचा थरार पहावयास मिळाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळाराम पाटील मताधिक्याने निवडून येतील
शिक्षक मतदारसंघाचे शेकाप पुरस्कृत (महाविकास आघाडीचे) उमेदवार बाळाराम पाटील यांनी आमदारकीच्या कार्यकाळात शिक्षकांचे विविध प्रश्‍न व समस्या मार्गी लावल्या आहेत. जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काम केले आहे. त्यामुळे बाळाराम पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्‍वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.

Exit mobile version