युवा-महिला मतदार ठरवणार रायगडचा खासदार

16 हजार नव मतदार; आठ लाख महिला मतदारांचा समावेश

| रायगड | प्रतिनिधी |

लोकसभा मतदार संघामध्ये तब्बल 16 लाख 53 हजार 935 मतदारांचा समावेश आहे. यातील विशेष बाब म्हणजे 18-19 वयोगटातील 16 हजार 288 मतदार हे प्रथमच 17 व्या लोकसभेसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये 8 हजार 920 युवकांचा तर, 7 हजार 368 युवतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 8 लाख 40 हजार 416 महिला मतदार आहेत. हेच मतदार रायगडचा खासदार ठरवणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुका शनिवारी जाहीर झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. तसे बघायला गेले, तर निवडणूक विभागाचे काम हे सातत्याने सुरुच असते. लोकसभेच्या निवडणुक पार पडल्यानंतर, विधानसभा, महापालिका, नगर पालिका/परिषद, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाचे काम हे निरंतर सुरुच असते. 2009 साली देशातील सर्व मतदार संघांची पुनर्रचना झाली होती. कुलाबा मतदार संघ बाद होऊन त्यांची जागा रायगड लोकसभा मतदार संघानी घेतली. रायगड लोकसभा मतदार संघाला रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग जोडण्यात आला. त्यामध्ये अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड या रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दोपोली विधानसभा अशा एकूण सहा मतदार संघाचा समावेश करण्यात आला.

32-रायगड लोकसभा मतदार संघ मतदार

विधानसभापुरुषस्त्रीअन्यएकूण
पेण15201314941301301427
अलिबाग 15552414830800293832
श्रीवर्धन 12754913227201259822
महाड 14070114101802281721
दापोली 13339314427900277672
गुहागर 11433512152600239461
एकूण 813515840416041653935

18-19 मतदार (23 जानेवारी 2024)

विधानसभा पुरुषस्त्रीअन्यएकूण
पेण 21761724003900
अलिबाग 18961498003394
श्रीवर्धन 1121849001970
महाड 1137935002072
दापोली 12991200002499
गुहागर 12911162002453
एकूण 892073680016288
Exit mobile version