। उरण। वार्ताहर ।
प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यातील नगरपालिका,नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी रविवारी 1 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनात रायगडातील नपा कर्मचारीही सहभागी झालेले आहेत. .जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली आहे.
विविध मागण्यासाठी संपूर्ण राज्यातील व उरण नगर परिषद मधील अधिकारी/ कर्मचारी वर्गांनी पहिल्या टप्प्यात एकत्र येत मागण्या बाबत दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी काळ्या फिती लावून निदर्शने केली तसेच दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी आझाद मैदान ते मंत्रालय भव्य मोर्चा काढण्यात आला.तरी देखील शासनाने दुर्लक्ष केल्याने दिनांक 1 मे 2022 पासून अत्यावश्यक सेवांसाहित काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत/संवर्ग कर्मचारी करत आहेत.असे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी माहिती दिली.
राज्यउपाध्यक्ष प्रदीप रावनकर, राज्यसरचिटणीस रामेश्वर वाघमारे, राज्यकोषाध्यक्ष अनिल पवार, राज्य कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ घुगे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव आदी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. .उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष गुडेकर, सचिव संजय पवार, सहसचिव आकाश कवडे, खजिनदार संजय दाते, सहखजिनदार रमेश सरवदे, कार्याध्यक्ष नितीन कासारे, सह कार्याध्यक्ष नितीन कांबरे, संघटक अनिल जगधणी, झुंबर माने, महिला संघटक सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनीषा उमते, भारती करंगुटकर, रशिदा शेख, कांचन तारेकर, सल्लागार झुंबर माने, राजेश कदम, संजय डापसे, हरेश तेजी, जयराम पाटील, विजय पवार, धनेश कासारे, सचिन भानुसे, संतोष कांबळे, संजय परदेशी,रमेश सरवदे,प्रमोद मटकर, अनिल कासारे आदी उरण नगर परिषदेचे कर्मचारी या संपात, काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
2 लाख कर्मचारी सहभागी
राज्यातील दोन लाखावर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी यांचे राज्यात सर्वत्र बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे.प्रलंबित मागण्याबाबत प्रदीर्घ काळापासून सरकार तोडगा काढत नसल्याने कर्मचारी संघटनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.महाराष्ट्रातील 369 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतीचे दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत