एटीएम फोडणार्‍या आरोपींना शोधण्यात रायगड पोलिसांचे यश

मात्र कागदपत्रांअभावी कार्यवाही लांबली

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 56 लाख रुपये चोरणार्‍या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. मात्र कागदपत्रांच्या अभावी अद्यापही ते चोरटे रायगड पोलिसांच्या हवाली करण्यात आलेले नाहीत.

शहरात 17 जानेवारी 2022 ला पहाटेच्या सुमारास सनसिटी इमारतीच्या तळमजल्यावर असणार्‍या एस.बी.आय. बँकेच्या दोन एटीएम. मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 56 लाख 34 हजार 800 रुपये चोरुन चोराने पोबारा केला होता. त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

या गुन्हयाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. अखेर 11 महिन्यानंतर रायगडच्या गुन्हे अनवेशन शाखेला यश आले असून या चोरीतील गुन्हेगार दिल्ली येथे सापडले आहेत. मात्र, काही कागद पूर्ततेमुळे रायगड पोलीसांच्या ताब्यात आरोपींना दिले नाहीत. मात्र, येत्या आठवडयाच्या आत या गुन्हयातील आरोपी रायगड पोलीसांच्या ताब्यात येतील. असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version