अथर्व, आर्या, अमृता, संस्कार विजेते
| पनवेल | वार्ताहर |
सब ज्युनिअर, ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) पॉवरलिफ्टींग स्पर्धा वृंदावन बाबा सभागृह, सेक्टर 5 नवीन पनवेल येथे पार पडली. या स्पर्धेत अथर्व लोधी, आर्या शिंदे, अमृता भगत, सब ज्युनि. स्पर्धेत संस्कार सरदार हे विजेते झाले. या जिल्हा स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, कर्जत, खोपोली, पनवेल, पेण येथील खेळाडूंनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांना गुरूद्वारा, गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लंगर सेवेद्वारे भोजन व्यवस्था केली होती. स्पर्धा उद्घाटनास पनवेल तालुका कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष रमेश फळसमकर, विद्यमान उपाध्यक्ष आणि पॉवर लिफ्टिंग रायगडचे कार्यकारिणी सदस्य सुभाष टेंबे, मुंबईचे पंच अंकुश सावंत, समीर दळवी, सुरेश धुळप, जितेंद्र यादव, सचिन भालेराव, संदीप पाटकर, राहुल गजरमल आदी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन अंकुश सावंत यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेस नवनाथ गायकर, गणेश तोट, विक्रांत गायकवाड, बबन झोरे आणि कुणाल पिंगळे यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत स्पर्धेचे सांघिक विजेतेपद आयर्न मेट जिम खोपोली आणि उपविजेतेपद संसारे फिटनेस पेण यांनी मिळविले. या स्पर्धेसाठी अमोल कडूस्कर, राजेश शिर्के, गोपीनाथ पवार, सुनील अडसूळ आदी नामवंत पंच हजर होते.