रायगड श्रावण सम्रादणी 2024 सोहळा

दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित

। पनवेल । वार्ताहर ।

दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित रायगड श्रावणसम्राज्ञी 2024 सोहळा सिंधी पंचायत हॉल, पनवेल येथे पार पडला. या सोहळ्याला कामगार नेते तसेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घरत, शुभांगी घरत, ममता प्रितम म्हात्रे, महाराष्ट्राचा लावणीसम्राट आशिमिक कामठे, आकाश पवार, पोलीस अधिकारी विशाल माने, समाजसेविका इंदू झा, रीचा पोरवाल, अ‍ॅड. मनोहर सचदेव, डॉ. रुक्मिणी अर्जुन धायगुडे, जयदादा डिगोले, प्रसाद रंगिले, कार्याध्यक्ष गौरव पोरवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी स्पर्धेमध्ये किड्स, मिस व मिसेस या कॅटेगरीमध्ये पार पडली. समाजात चालू असलेल्या महिला व मुलींच्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करत ‘बेखोफ है आजाद जीना मुझे या थिम’वर आधारित लहान मुलांच्या स्पर्धेतून या विषयावर वेगवेगळे संदेश देऊन ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये एकूण 46 स्पर्धाकांचा सहभाग होता. शो डायरेक्टर अ‍ॅक्टर देवादत्ता घरत व पूनम शेलार, सुवर्णा कुंभार यांच्या उत्तम कोरिओग्राफीमुळे स्पर्धेतील मुलांनी उत्तम सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षक मॉडेल पूजा शिर्के, ज्ञानेश्‍वर बांगर व गीता कुडाळकर यांनी पाहिले. बी.बी. बाटिया ज्वेलर्सकडून सर्व स्पर्धकांना गिफ्ट ही देण्यात आहे. इतर स्पर्धकांना सबटायटल देऊन सन्मानित करण्यात आले. लावणीसम्राट आशिमिक कामटे यांच्या बहरदार लावणीने कार्यक्रमात रंगत आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी विशाल माने यांनी अत्यचाराच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे महेंद्र घरत यांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

मुलीवर सध्या काही दिवसांपासून घटणार्‍या घटनांवर भाष्य करणार्या स्पर्धेतून सामाजिक संदेश देण्याचा हेतू या सोहळ्यातून होता, असे संस्थापक नीलम आंधळे यांनी सांगितले. आर.जे. कोमल डांगे यांनी सूत्रसंचालन, तर आभार उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी मानले. डॉ. हेमंत पाटील, विजय चिपळेकर, दलीप पाटील, ड्रेस डिझाईनर पूर्णिमा गोळे, एनआरएल मेकअप अकॅडेमी, सनी अग्रवाल यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाला.

यामध्ये विजेते स्पर्धक : मिस कॅटेगरी विनर नैनित काकारा, फर्स्ट रनरअप अपर्णा म्हेत्रे, सेकंड रनरअप चिन्मयी मेडगे. मिसेस कॅटेगरी ः विजेती स्वाती पडवळ, फर्स्ट रनरअप काजल जाधव, सेकंड रनरअप शर्वरी निकम. किड्स बेस्ट परफॉर्मन्समध्ये स्वानंदी शेडगे, आरुषी धनावडे, अक्षरा आलेवाड यांचा समावेश आहे.
Exit mobile version