राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत रायगडचे विद्यार्थी चमकले

| खरोशी | वार्ताहर |

नुकत्याच कोल्हापूर इचलकरंजी येथे देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त इंडियन एल्बोबॉक्सिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या 6 व्या राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वात जास्त मेडल संपादन करून अजिंक्यपद पटकाविले.

या स्पर्धेत महाराष्ट्रा कडून रायगड एल्बोबॉक्सिंग असोशिएशनचे खेळाडू चमकले त्यामध्ये रुद्रेश प्रथमेश पाटील (सुवर्ण), प्राजक्त प्रकाश तेटमे (सुवर्ण), स्मित श्रीकांत म्हात्रे (रौप्य), रितुल रविंद्र म्हात्रे (रौप्य), मोहीत परशुराम कोठेकर (रौप्य) प्रियल हेमंत म्हात्रे (कांस्य), हितेष रविंद्र बेकावडे (कास्य) पटकावले ह्या सर्व खेळाडूंना रायगड जिल्हा एल्बोबॉक्सिंग असोशिएशन चे अध्यक्ष रविंद्र म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

या सर्व विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग असोशिएशनचे अध्यक्ष सूरेश कोळी सचिव यशवंत माने, तसेच युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंदार पनवेलकर व सर्व युनायटेड चे पदाधीकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version