। अलिबाग । भारत रांजणकर ।
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशातील 12 हजारपेक्षा जास्त नागरिक युक्रेनमध्ये असून त्यातील 1200 च्या वर विध्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. त्यापैकी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील व्हिडिओ कृषीवलसोबत शेअर केले आहेत. विद्यार्थी भीतीच्या छायेखाली असून त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारत सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनास विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रायगड येथील शिक्षणासाठी गेलेले 23 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.