। पनवेल । वार्ताहर ।
मॉर्डन पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी लेझर रन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा अहमदनगर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी बाजी मारली.
या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील वेगवान धावपटू सिद्धेश काटे या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तसेच 17 वर्षे मुलांमध्ये अथर्व वैभव म्हात्रे या विद्यार्थ्यांने सुवर्णपदक तर 15 वर्षाच्या खालील मुली वैभवी किरण भोईटे या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. कल्याणी जायकर 11 वर्ष वयोगटांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रायगड जिल्हा मॉर्डन पेंटेशन असोसिएशनतर्फे विजयी खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.