। गडब । वार्ताहर ।
नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलन काळात श्री धायरेश्वर वाहतुक संघटनेकडून ट्रक चालकांना नाष्ट्याची व जेवणाची मोफत व्यवस्था केली होती.
पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्लु कंपनीतील मालवाहतुक करणारे ट्रक चालक आंदोलनात सहभागी होते. यावेळी कॉईलची वाहतुक व इतर वाहतुक ठप्प झाली होती. अनेक ट्रक पार्कीगमध्ये होते. ट्रक चालकांची गैरसोय टाळण्यासाठी श्री धायरेश्वर वाहतुक संघटना डोलवी येथील वाहतुक संघटनेने जेवणांची मोफत व्यवस्था केली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी दिली. या आंदोलन काळात वडखळ पोलिस ठाण्याचे निरिक्षक तानाजी नारनवर यांनी ट्रक चालकांशी संवाद साधुन नविन कायद्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच शांताता राखण्याचे अवाहन केले.
रायगड ट्रक चालकांना वाहतूक संघटनेकडून मदत
