16 वर्षाखालील रायगड क्रिकेट संघाची निवड चाचणी संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे 16 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी पनवेल तालुक्यातील खारघर येथे 16 आणि 17 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. दोन दिवसीय निवड चाचणी शिबिरात 56 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या खेळाडूंमध्ये काही सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामान्यांमधून अंतिम 20 खेळाडूंचा रायगडचा संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात येणार्‍या आमंत्रितांच्या विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
उरण येथील अमित पाटील,संदीप पाटील,पनवेल येथील पंकज पाटील,योगेश वाघ, पेण तालुक्यातील सागर मुळे,रोहन तांडेल,अमोल येरुणकर आणि अलिबाग तालुक्यातील शैलेश महाडिक या निवड समितीने दोन दिवसीय निवड चाचणी शिबिरात 56 संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. या निवड चाकाहणी शिबिरासाठी कुणाल पाटील यांनी बाळाराम पाटील अकॅडमीचे सुसज्ज नेट उपलब्ध करून दिले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते , सचिव विवेक बहुतुले,सदस्य किरीट पाटील,संदीप पाटील,सुहास हिरवे,प्रशांत माने,राजेंद्र कोंढाळकर आणि दिनेश लाड उपस्थित होते.

Exit mobile version