रायगडच्या क्रीडाविश्‍वात चैतन्य आणणार

पालकमंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन
। धाटाव रोहा । वार्ताहर ।
खेलो इंडिया संकल्पनेतून रायगडच्या क्रीडाविश्‍वात चैतन्य निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड, तालुका क्रीडा अधिकारी रोहा आयोजित क्रीडा संकुल रोहा नूतनीकरण उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमासाठी आ. अनिकेत तटकरे,ि जल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, जयवंत मुंढे, शंकर भगत, प्रदीप देशमुख, अनंत देशमुख, सतीश भगत, डॉ. अशोक जाधव, संतोष भोईर, सरपंच सुवर्णा रटाटे, यशवंत रटाटे, युवती अध्यक्षा रविना मालुसरे, महेंद्र गुजर, मयूर दिवेकर, लगोरीपटू श्री. गुरव, तालुका क्रीडा अधिकारी, तहसीलदार कविता जाधव, क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, क्रीडा अधिकारी सचिन निकम, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, धाटाव ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीच्या बर्‍याच कालावधीनंतर संकुलाची दुरुस्ती करणे फार गरजेचे होते. त्यानुसार निधी उपलब्ध करुन रोहा तालुका क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्यात आली. खेलो इंडिया, ऑलम्पिक स्पर्धांमध्ये आपल्या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होतील, या भविष्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहोत. आता रोहा क्रीडा संकुलात विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांना आवाहन केले. 80 कोटी निधीची मंजुरी असलेले कोकण विभागीय क्रीडा संकुल माणगाव येथे सुरु होत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, कार्यक्रमात क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. तसेच दर्जेदार काम करणार्‍या मेसर्स सुरज कंस्ट्रक्शनचे संचालक तथा रोहा तालुका बडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष भोईर यांचे कौतुक करण्यात आले.

ग्रामीण भागांतील खेळांडूना प्रोत्साहन मिळावे व दर्जेदार खेळाडू घडावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती केली. विविध क्रीडा प्रकारांचा सराव करुन खेळाडूंची एक पिढी उभे करण्याचे काम क्रीडा संकुल करीत आहे. – अदिती तटकरे, पालकमंत्री

Exit mobile version