राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगडची बाजी

। खांब-रोहे । वार्ताहर ।
स्टुडंटस् ओलंपिक असोसिएशन अमरावती यांच्या वतीने अमरावती येथे झालेल्या 7 वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगडच्या संघाने सुयश संपादित करून रायगड जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.
आ.बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर या स्पर्धेतील रायगड जिल्ह्यातील विविध भागातील समाविष्ट करण्यात आलेल्या श्री.शिव प्रतिष्ठान पनवेल-रायगड या संघाच्या वतीने खेळविण्यात आलेल्या 17 व 19 वयोगट मुलांच्या संघांनी अंतिम फेरीत दमदार कामगिरी करून अनुक्रमे द्वितीय व तुतीय क्रमांक संपादित केला आहे.

या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये 17 वर्षे वयोगट मुले कबड्डी स्पर्धेत अमरावती संघाने रायगड संघाचा पराभव केल्याने रायगड संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर 19 वर्षे वयोगट स्पर्धेतही तिसर्‍या फेरीत अमरावती संघाकडून रायगडचा पराभव झाल्याने तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर 19 वर्षे वयोगट स्पर्धेत योगेश काशीद, प्रणिल गिजे, कौस्तुभ गायकवाड, साहील पवार, सुजल काशीद, रोहित भोसले, हर्षल कोस्तेकर, मनिष खारगावकर, अन्वय कांबळे, प्रतिक पवार, सागर राजपूत आदी खेळाडू सहभागी झाले होते. तर 17 वर्षे वयोगट मुलांचे संघात ओम ठाकूर, करण झोलगे, राज बाकाडे, स्वराज वाळंज, श्रीयोग महाबळे, प्रतिक लोखंडे, सागर राजपूत, संयोग गायकवाड, पियुष मरवडे, हर्षल कोस्तेकर आदी खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. 17 व 19 वर्षे वयोगट या दोन्ही संघातील सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी करून रायगड जिल्ह्याचे नाव रोशन केल्याने दोन्ही संघातील खेळाडूंचे माजातील सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Exit mobile version