रायगड जिल्हा परिषद बेकरेवाडी शाळेवर झाड कोसळले…..

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरेवाडी या आदिवासी वाडीमधील रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून त्या शाळेच्या इमारतीवर 6 ऑक्टोबर रोजीच्या वादळात मोठे झाड कोसळले. कोसळलेल्या या झाडामुळे शाळेचे नुकसान झाले असून या आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना तात्पूरत्या स्वरूपात अन्य ठिकाणी बसवून शिक्षण घ्यावे लागणार आहे. माथेरान डोंगराच्या कुशीत वसलेले बेकरेवाडी हे एक लहानसे गाव आहे. त्या वादळात रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरेवाडी या शाळेवर झाड कोसळले आहे, यावेळी शाळेच्या समोरच्या बाजूस झाड कोसळल्यामुळे तेथील शाळेत शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते चौथी या आदिवासी मुलांना अन्य ठिकाणी बसून शिक्षण घावे लागणार आहे. पालकांकडून शाळेच्या इमारतीवर पडलेले झाड बाजूला करण्याची मागणी केली असून समाजिक कार्यकर्ते जैतू पारधी व गणेश पारधी यांनीही शासनाने या घटनेकडे लक्ष देऊन शाळेच्या इमारतीवर कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Exit mobile version