राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत रायगडची उत्तुंग भरारी

36 सुवर्ण, 12 रौप्य, 16 कांस्यपदकांची लयलूट

| मुरूड । प्रतिनिधी ।

तीसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्य पद क्रिडा स्पर्धा 2022 तुळजापूर येथे संपन्न झाली. यात अलिबाग, भोनंग, मुरुड व जिल्ह्यातून 36 खेळांडुनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत 36 सुवर्ण पदक, 12 रौप्य पदक व 16 कांस्य पदक पटकावत राज्यात रायगडचा झेंडा रोवला आहे. या स्पर्धेत पदकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यात लाठी रायगड संघाने दुसरा क्रमांक पटकावत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

या स्पर्धेत मुलांनमध्ये शिवम गुंजाळने एक सुवर्ण व एक कांस्य, मंथन कदम एक कांस्य, प्रियेश मसाल एक सुवर्ण एक रौप्य एक कांस्य, भावार्थ पाटील एक रौप्य पदक, आराध्य शेळके दोन सुवर्ण, मिहिर शेळके एक सुवर्ण, तेज शेळके एक कांस्य, वेद कदर दोन कांस्य, मल्हार गुंजाळ दोन सुवर्ण, वेदास्तु गुरुव दोन रौप्य, देवदत्त पडवळ दोन सुवर्ण, अर्णव तिवरेकर एक रौप्य, हार्दिक अकोलकर एक रौप्य, हित म्हात्रे एक सुवर्ण, हर्ष पाटील एक रौप्य एक कांस्य, सुजल झावरे एक सुवर्ण पदक एक कांस्य, रुद्र झावरे एक कांस्य, स्वरुप पाटील एक सुवर्ण एक कांस्य, दीप झावरे एक कांस्य, श्रवण शेळके सुवर्ण एक कांस्य, मनस्व शेळके एक रौप्य, सिध्दार्थ पाटील दोन सुवर्ण एक रौप्य, शिव हिलम दोन सुवर्ण दोन रौप्य, रुद्राक्ष खारकर सुवर्ण एक रौप्य, निशांक शेळके दोन सुवर्ण पदके पटकवली. तर मुलींमध्ये आोवी शेळके तीन सुवर्ण, आराध्या वर्तक एक सुवर्ण एक कांस्य, आराध्य नखाते एक सुवर्ण एक कांस्य, स्नेहा मसाल दोन सुवर्ण एक कांस्य, तमना पाटील दोन सुवर्ण एक कांस्य, सृष्टी म्हामूणक एक सुवर्ण एक कांस्य, साना तुळपुळे दोन सुवर्ण एक रौप्य, स्मृती म्हात्रे एक सुवर्ण दोन कांस्य, रेवा पाटील एक सुवर्ण एक कांस्य, लावण्या भगत दोन सुवर्ण, नम्रता चव्हाण एक सुवर्ण एक कांस्य पदक मिळाले.

सर्व खेळांडुनी एकम लाठी, दुय्यम लाठी, द्वै अनिखा, काटपवित्रा आणि पंचम लाठी या प्रकारात हे सर्व पदक कमावली आहेत. सुवर्ण पदक विजेत्या खेळांडूची निवड राष्ट्रीय स्पर्धे करीता महाराष्ट्र संघासाठी निवड झाली आहे. या सर्व खेळांडुना प्रियंका गुजांळ, शुभम नखाते, वेदांत सुर्वे, रुपेश शेळके यांचे प्रशिक्षण व मोलाचे मार्गदशन लाभले.

Exit mobile version